मराठी कोडी व उत्तरे | Marathi Riddles With Answers

30+ सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे | 15 Marathi Riddles With Answers मित्रांनों तुम्हाला सुद्धा मराठी कोडी सोडवायला आवडतात का ? तर मग हया पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कष्ट मराठी कोडी व उत्तरे दिलेले आहेत (30+ Marathi Riddles with Answers), जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामापासून काही वेळासाठी आराम तर देणारच सोबतच  तुमच्या मतिष्काची कसरत सुद्धा होईल. Marathi kodi with answer हया खेळाच्या मदतीने आपण आपले मित्र किती मराठी कोडी (Puzzles in marathi) सोडवू शकतात हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी पाठवा आणि त्यांची मजा घ्या.

माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर त्याच्या बायकोचे नाव !

1. Marathi Kodi
एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव ! दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?
    • सीताराम

वेडा नसून कागद फाडणारा

2. Marathi Kodi
पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो।
    • कंडक्टर/ बस वाहक

चार विहीरी  बीना पानी

3. Marathi Kodi
चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी।
    • कॅरम बोर्ड गेम

कुट कुट काडी पोटात नाडी

4. Marathi Kodi
कुट कुट काडी पोटात नाडी,
राम जन्मला हातजोडी, 
कृष्ण जन्मला हात जोडी।
    • देवर्‍यातील घण्टी / टाळ

एवढीशी नन्नुबाय मराठी कोडी

5. Marathi Kodi
एवढीशी नन्नुबाय,
साऱ्या वाटणं गीत गाय।
    • शिट्टी

आहे मला मुख,परंतु खात नाही

6. Marathi Kodi
आहे मला मुख,परंतु खात नाही,
दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,
माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही
वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही, 
मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून।
    • नदी

आटंगण पटंगण -मराठी कोडी

7. Marathi Kodi
आटंगण पटंगण 
लाल लाल रान,
अन् बत्तीस पिंपळांना 
एकच पान 
    • तोंड(दात आणि जीभ)

ज्याचं येणं पण खराब व जाणे पण खराब

8. Marathi Kodi
असे काय आहे, ज्याचं येणं पण खराब आहे
आणि
ज्याचं जाणे पण खराब आहे?
    • डोळे

पाऊस आला तरी भिजत नाही

9. Marathi Kodi
असं काय आहे, जे कितीही पाऊस आला,
तरी भिजत नाही...? 
    • पाणी

बाजारात न विकले जाणारे फळ

10. Marathi Kodi
असे कोणते फळ आहे, जे बाजारात विकले जात नाही?
    • मेहनतीचे फळ

पाणी पिल्याने नष्ट होते

11. Marathi Kodi
असे काय आहे, जे पाणी पिल्याने नष्ट होते...?
    • तहान

नेहमीच वाढत जाते परंतु कमी होत नाही

12. Marathi Kodi
अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही?
    • वय

वापरण्याआधी तोडावे लागते

13. Marathi Kodi
अशी कोणती गोष्ट आहे, जिला वापरण्याआधी तोडावे लागते?
    • अंड 

सगळी मुले खातात, पण मुलांना आवडत नाही

14. Marathi Kodi
अशी कोणती गोष्ट आहे, जी सगळी मुले खातात, पण मुलांना ते आवडत नाही?
    • पालकांचा मार

कोणते टेबल खाऊ शकतो ?

15. Marathi Kodi
आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो?
    • व्हेजिटेबल