गमंतशीर मराठी कोडी | Marathi Code With Answers
लहान मुलांना अनेक गमंतशिर मराठी कोडी सोडवायला करायला | तथापि, त्यांनी फक्त अशा गोष्टी करणे अपेक्षित आहे ज्यामुळे मजा आणि सहजता येते| प्रौढांकरीता सुद्धा काही वेळ गमंतशीर कोडी सोडविणे फायदेशिर ठरू शकते. म्हणून, आमच्याकडे तुमच्यासाठी सर्वात गमंतशीर मराठी कोडी (Riddles in Marathi) चा संग्रह आहे| जो तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये काही वेळ नक्कीच विश्रांतीदायक ठरणार| तर, विश्रांती घ्या आणि या मजेदार मराठी कोडी सह मजा करा| हे छोटे आव्हान आहे, तुम्हाला ते आवडेल|
तुम्ही आव्हानासाठी तयार आहात का ?
1. जर रामराव हे काजलचे वडील आहे, तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे?
उत्तर : रामराव
2. एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण किती सफरचंद ठेवू शकतो?
उत्तर : एक, कारण त्यानंतर बॉक्स रिकामा राहणार नाही.
3. अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण आपण खात नाही?
उत्तर : खेळायचे पत्ते.
4. सोमवार, मंगळवार, बुधवार,गुरुवार, शुक्रवार,
शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता
आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकतो का?
उत्तर : हो. काल, आज आणि उद्या..
5. एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे; संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी, फोन आणि एक चहाचा कप आहे. जर बॉम्बचा स्फोट झाला तर सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?
उत्तर : बॉम्बचा.
6. अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत, दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभा राहावे लागते?
उत्तर : पाणी पुरी खाताना
7. एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती.
त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही.
असे का?
उत्तर : त्या माणसाच्या डोक्यावर केसच नव्हते.
8. रामच्या वडिलांना एकूण चार मुले आहेत.
पहिल्या मुलाचे नाव - ABC
दुसऱ्या मुलाचे नाव - DEF
तिसऱ्या मुलाचे नाव - GHI
तर मग चौथ्या मुलाचे नाव काय?
उत्तर : राम
9. थांबून वाजते पण घड्याळ नाही,
बारीक लांब पण काठी नाही,
दोन तोंडची पण साप नाही,
श्वास घेते पण तुम्ही नाही?
उत्तर : बासरी
10. एक माकड, एक खार आणि एक पोपट आंब्याच्या झाडाकडे जोरात धावत असतात,
तर मग कोण त्या झाडावरील पेरू सर्वप्रथम खाईल...?
उत्तर : आंब्याच्या झाडाला पेरू येणार नाहीत.
11. अशी कोणती इमारत आहे,
ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही,
तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता...?
उत्तर : ज्याठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत
12. एकदा एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची मुभा दिली जाते, परंतु त्यासाठी त्याला तीनपैकी एका खोलीतून प्रवेश करायचा असतो.
पहिल्या खोलीत भयंकर अशी आग आहे,
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहे, कि ज्यांचा त्याच्या पाय ठेवण्याने भयानक स्फोट होऊ शकतो.
तिसऱ्या खोलीत एक सिंह आहे, कि ज्याने मागच्या तीन वर्षांत काहीही खाल्लेलं नाही.
तर त्या कैद्याने कोणत्या खोलीतून गेले पाहिजे?
उत्तर : तिसऱ्या खोलीतून. कारण मागच्या तीन वर्षापासून काहीही न खाल्लेला सिंह जिवंतच नसेल
13. एका वडिलांनी आपल्या मुलाला एक वस्तू भेट दिली आणि सांगितले कि जर तुला भूक लागली तर ती वस्तू खा, तहान लागली तर पाणी पी व थंडी वाजली तर ती वस्तू जाळून टाक. तर मग वडिलांनी आपल्या मुलाला कोणती वस्तू भेट म्हणून दिली असेल?
उत्तर : नारळ
14. एक माणूस आपल्या बायकोला मारतो आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की, त्याच्या बायकोची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात. पोलीस त्या व्यक्तीला अटक का करतात?
उत्तर :त्या माणसाच्या बायकोचे शरीर ज्याठिकाणी लपवलेले असते, त्याचा पत्ता पोलिसांनी त्या माणसाला सांगितलेला नसतो.