Puzzles In Marathi With Answer | Marathi Riddles
नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मराठी कोडी {Marathi riddles} दिलेले आहेत.कोडे सोडवा (Puzzles in Marathi) खेळल्याने आपला वेळ छान तर जातोच पण आपली मैत्री हि अजून घट्ट होते. ह्या इंटरनेटच्या युगात हा Marathi kodi with answer खेळ खूप कमी झाला आहे.आपले मित्र किती हुशार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्याना कोडी मराठी (Puzzles in Marathi) पाठवा आणि त्याची मजा घ्या.
1. नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर -कांदा
2. नसते मला कधी इंजीन
नसते मला कसलेही इंधन
आपले पाय चालवा भरभर
तरच धावणार मी पटपट
सांगा मी आहे तरी कोण ?
उत्तर -सायकल
3. मी नेहमी तिथेच असतो
तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता
रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर -सूर्य
4. अशी कोणती गोष्ट आहे तुमची
जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात
उत्तर -नाव
5. छोटेसे कार्टे
संपूर्ण घर राखते
उत्तर -कुलूप
6. उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता
हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता
माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग
सांगा पाहू मी कोण
उत्तर -ऊन
7. आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी
तरीही भेटत नाही जन्मोजन्मी
उत्तर -डोळे
8. प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे
तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता
परंतु उजव्या हाताने नाही
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर -उजवा कोपरा
9. एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल
एक मेला एक विकला
आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?
उत्तर -एक किंवा शून्य
10. मी सगळ्यांना उलटे करतो
तरीही स्वःतला काहीच हलवू शकत नाही
उत्तर -आरसा
11. बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण
उत्तर -घड्याळ
12. तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
सांगा पाहू मी कोण?
उत्तर -वाहक {Conductor}
13. एक कपिला गाय
आहेत तिला लोंखडी पाय
राजा बोंबलत जातो
पण ती थांबत नाही
उत्तर -रेल्वे
14. बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर -बासरी
15. संपूर्ण गावभर मी फिरते
तरीही मंदिरात जायला मी घाबरते
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर -चप्पल
16. मातीविना उगवला कापूस लाख मन
पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन
ओळखा पाहू मी कोण
उत्तर -ढग
17. दात असून सुद्धा मीच आवडत नाही
काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - कंगवा
18. एक लाल गाई
नुसती लाकूड खाई
जर पाणी पिले
तर मरून ति जाई
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - आग
19. एक रूमाल वाढायला एक तास लागतो
तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील
उत्तर - एक
20. पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - पेन
21. काळे बीज आणि पांढरी आहे जमीन
लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - पुस्तक
22. मी कधीही आजारी पडत नाही
तरीसुद्धा लोक मला गोळी देतात
उत्तर - बंदूक
23. आम्ही दोघे जुळे भाऊ
एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे
सोबत असता खुप कामाचे
एक हरविता नाही काम दुसऱ्याचे
उत्तर - चप्पल
24. दगड फोडता चांदी चकाकली
चांदीच्या आडात मिळाले पाणी
सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - नारळ
25. सगळीकडे आहे उजेड आणि गाणी
मी तर आहे सणांची राणी
सांगा पाहू मी कोण
उत्तर - दिवाळी