ओळखा पाहू मी कोण ? मराठी कोडी | Marathi Kodi with Answer


काय तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती हवी आहे? आमचे Marathi Kodi with Answer तपासा. मेंदूच्या विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी मराठी कोडी  नेहमीच सर्वोत्तम आहेत, मग ते कठीण, सोपे किंवा साधे Marathi Puzzles असू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील एक मजेदार भाग म्हणून Marathi Kodi नेहमीच सर्वोत्तम राहिल्या आहेत.

त्यात एखाद्या वस्तुंचे नांव कोडी ने ओळखने तर खुपच मजेदार असते. तुमच्या करीता आम्ही 15 असे ओळखा पाहू मी कोण मराठी कोडी उत्तरासह दिलेल्या आहेत. ज्या सोडवतांना तुम्हाला मजा पण येणार आणि तुमच्या मतिष्काची चांगलीच कसरत होणार.  तर चला बघु या तुम्ही किती कोडी ओळखू शकता ? 

तुम्ही आव्हानासाठी तयार आहात का?

odkha pahu mi kon

1. बारा जण आहेत जेवायला, एक जण आहे वाढायला, ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर :   घड्याळ 

 

2. एक कपिला गायआहेत, तिला लोंखडी पाय, राजा बोंबलत जातो, पण ती थांबत नाही,ओळखा पाहू ती कोण ?

उत्तर : रेल्वे

 

3. आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी, तरीही भेटत नाही जन्मोजन्मीआम्ही जुळे भाऊ,  ओळखा पाहू आम्ही कोण ?

उत्तर : डोळे 

 

4. मी नेहमी तिथेच असतो, तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता, रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही, सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : सूर्य

 

Marathi kodi ad - 1

 

5. लाल मी आहे पण तो रंग नाही, कृष्ण मी आहे पण देव मी नाही, आड आहे पण पाणी त्यात नाही, वाणी आहे पण दुकान माझं नाही, सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : लालकृष्ण आडवाणी

 

6. मी आहे तरी कोण ? तिच्या डोळ्यात बोटे टाकली की माझं तोंड उघडते,
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : कात्री 

 

7. एका काळ्याकुट्ट राजाची, अद्भुत मी राणी, हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :  दिवा 

 

8. हिरव्या घरात लपले एक लाल घर, लाल घरात आहेत खूप लहान मुले, ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :  कलिंगड 

 

9. काळ्याभोर रानात एक हत्ती मेला, लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला
सांगा मी कोण ?

उत्तर : कापूस 

 

Marathi kodi ad - 2

 

10. कोकणातून आली माझी सखी, तिच्या मानेवर दिली मी बुक्की, तिच्या घरभर पसरल्या लेकी, सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :  लसुन

 

11 असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या-घेतल्या ते अदृश्य होते?

उत्तर: शांतता

 

12. तुम्ही मला पाण्यात पाहू शकता, परंतु मी कधीही ओली होत नाही.
ओळखा पाहू मी कोण आहे?

उत्तर: एक प्रतिबिंब

 

13. मी तरुण असतो तेव्हा मी उंच असतो, मी जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?

उत्तर: एक मेणबत्ती / पेन्सिल

 

Marathi kodi ad - 3

 

14. लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, परंतु कधीही मला खात नाही. ओळखा पाहू मी कोण आहे?

उत्तर: प्लेट्स / कटलरी

 

15. जेव्हा मी जिवंत असेल तेव्हा सर्व जण गाणं गातात, जेव्हा मी मरते तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात.
ओळखा पाहू मी कोण आहे?

उत्तर: वाढदिवसाला वापरलेल्या मेणबत्त्या

 


marathi kodi blogs

marathi-kodi-with-answers
Sarika Singh 2024-5-22

मराठी कोडी व उत्तरे | Marathi Riddles With Answers

मराठी कोडी व उत्तरे, here is the most viral Marathi riddle you have to solve to increase your IQ. Ca...

majedar-marathi-riddles
Lipika Lajwani 2024-5-23

मजेदार मराठी कोडी | Marathi Riddles With Answers

मजेदार मराठी कोडी , here is the most viral Marathi riddle you have to solve to increase your IQ. Can...

gamatshir-marathi-kodi
Lipika Lajwani 2024-5-23

गमंतशीर मराठी कोडी | Marathi Code With Answers

गमंतशीर मराठी कोडी , here is the most viral Marathi riddle you have to solve to increase your IQ. Ca...

marathi-kodi-with-answers
Lipika Lajwani 2024-5-23

Marathi Riddles | मराठी कोडी

Everyone enjoys riddles and loves to share them with their friends and family, so here are some of t...

puzzles-in-marathi
Lipika Lajwani 2024-5-24

Puzzles In Marathi With Answer | Marathi Riddles

Puzzles in Marathi are loved by all. It is the best way to relax and unwind while exercising your mi...