Marathi Riddles | मराठी कोडी
20 पेक्षा जास्त मराठी कोडी व उत्तरे
मित्रांनो लहानपणीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे मराठी कोडी (Marathi riddles). आणि मराठी कोडी सोडवायला सुद्धा खूप मज्जा येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कोडी (Marathi riddles) पाहणार आहोत. ही कोडी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील.
1. सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे नी वेलांटी नावात
नांव सांगा त्याचे ?
उत्तर -अहमदनगर
2. मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर -वांगे
3. चार खंडाचा आहे एक शहर
चार आड विना पाण्याचे
18 चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण
उत्तर -कॅरम
4. कोकणातून आली माझी सखी
तिच्या मानेवर दिली मी बुक्की
तिच्या घरभर पसरल्या लेकी
सांगा पाहू मी कोण
उत्तर -लसुन
5. चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजार म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण
उत्तर -हातमोजे
6. गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?
उत्तर -ताट
7. दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
उत्तर -काजवा
8. बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती
उत्तर -नारळ
9. पाच अक्षराचा एक पदार्थ
पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव
पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज
पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर
सांगा पाहू मी कोण?
उत्तर -गुलाबजाम
10. एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण
उत्तर -वर्ष
11. भाऊराया माझा खूप शैतान
बस तू माझ्या नाकावर
पकडून माझे कान
सांगा आहे तरी मी कोण
उत्तर -चष्मा
12. एका काळ्याकुट्ट राजाची
अद्भुत मी राणी
हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण
उत्तर -दिवा
13. कोकणातून आली एक नार
आहे तिचा पदर हिरवागार
आहे तिचा कंबरेला पोर
सांगा मी आहे तरी कोण
उत्तर -काजू
14. अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता
किंवा ती तुम्हाला गिळू शकते
सांगा पाहू ती आहे कोणती
उत्तर -अहंकार
15. कोकणातून आलेला एक रंगू कोळी
आणि त्याने एक भिंगु चोळी
शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी
धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी
राणी म्हणते मी घालू तरी कशी
सांगा पाहू मी कोण
उत्तर -कागद
16. एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला
तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे
उत्तर -तो पहिल्याच पायरीवर होता
17. कोकणातून आला एक भट
त्याला धर की आपट
सांगा मी आहे तरी कोण
उत्तर -नारळ
18. हिरव्या घरात लपले एक लाल घर
लाल घरात आहेत खूप लहान मुले
ओळखा पाहू मी कोण
उत्तर -कलिंगड
19. काळ्याभोर रानात एक हत्ती मेला
लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला
सांगा मी कोण
उत्तर -कापूस
20. तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात
तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता
तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण
उत्तर -तुम्ही
21. काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा
निघालास कुठे शेंबड्या पोरा
ओळखा पाहू मी कोण
उत्तर -फणस
22. एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
उत्तर - नारळाच्या झाडावर केळी नसतात
23. माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
सांगा मी आहे कोण
उत्तर -कीबोर्ड
24. असे फळ कोणते
त्याच्या पोटात दात असतात
उत्तर -कीबोर्ड
25. दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे आपले माझे काम
ओळखा पाहू मी आहे कोण
उत्तर -टोपी