Kodi in Marathi | मराठी कोडी
तुम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती हवी असल्यास? आमचे सर्वोत्कृष्ट kodi in Marathi पहा. उत्तरे असलेली मराठी कोडी मेंदूला आराम आणि मनोरंजनासाठी नेहमीच योग्य ठरते, मग ते कठीण, सोपे किंवा साधे कोडे असोत. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील एक मजेदार भाग म्हणून त्यांनी नेहमीच सर्वोत्तम खेळ केला. येथे, काही मराठी कोडी व उत्तरे यांचा संग्रह आहे, तर, चला बघु या तुम्ही किती मराठी कोडे सोडवू शकता ?
1 . जगाच्या खबरी साठवून ठेवतो
खूप मोठे माझे पोट
म्हणूनच तर प्रत्येक सकाळी
आता सर्वजण माझी वाट
उत्तर- वर्तमानपत्र
2. रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- नकाशा
3. लाईट गेली माझी आठवण झाली
असो मी लहान किंवा मोठी
माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
सांग मी आहे तरी कोण
उत्तर- मेणबत्ती
4. अवतीभोवती आहे लाल रान
32 पिंपळाना फक्त एकच पान
सांग भाऊ मी कोण
उत्तर- दात आणि जीभ
5. पांढरे माझे पातेले
त्यात ठेवला पिवळा भात
ओळखेल मला जो कोणी
त्याच्या कमरेत घाला लाथ
उत्तर- उकडलेले अंडे
6. मी तिखट मीठ मसाला
मला चार शिंगे कशाला
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर- लवंग
7. गळा आहे मला पण डोकं नाही मला
खांदा आहे मला पण हात नाहीत मला
सांगा भाऊ मी आहे कोण
उत्तर- शर्ट
8. एक सूप भरून लाह्या
त्यात फक्त एक रुपया
उत्तर- चंद्र आणि चांदण्या
9. तीन पायांची एक तीपाले
बसला त्यावर एक शिपाई
सांगा पाहू मी कोण
उत्तर- चूल आणि तवा
10. गावचे पाटील तुम्हाला राम राम
दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब
उत्तर- मक्याचे कणीस
11. एक गोष्ट जी
खायला कुणाला आवडत नाही
पण सर्वांना मिळते
उत्तर- धोका
12. हिरवा आहे परंतु पाने नाही
नक्कल करतो मी परंतु माकड नाही
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- पोपट
13. वस्तू आहे मी अशी
छिद्रे असतानाही असतानाही
पाणी भरून मी घेते
उत्तर- स्पंज
14. प्रत्येकाकडे असते मी
सगळे सोडून जातील
पण मी कधीच सोडून जाणार नाही
उत्तर- सावली
15. मी नेहमी तुमच्या पुढे असतो
तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर- भविष्य
16. एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी
एक उतरवली आता दुसर्याची पाळी
सांगा पाहू मी कोण
उत्तर- तवा आणि पोळी
17. काळी मी आहे परंतु कोकिळा नाही
लांब मी आहे परंतु काठी नाही
थांब मी जाते परंतु दोरी मी नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर- वेणी
18. ना खातो मी अन्न
ना घेतो मी तुमच्याकडून पगार
तरीही देतो पहारा दिवस रात्र
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर- कुलूप
19. सुरेश च्या वडिलांची चार मुले
रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा
उत्तर- सुरेश
20. मी गोष्ट कशी आहे जी
फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार
सांगा पाहू मी कोण
उत्तर- गरम मसाला
21. संपूर्ण पृथ्वीची करतो मि सैर
परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर
दिवसा काढून झोपा
रात्रभर मी जागतो
सांगा पाहू मी कोण असतो
उत्तर- चंद्र
22. उंचावरून पडली एक घार
तिला केले मारून ठार
आतील मास खाऊ पटापट
गोड रक्त पिऊ गटागट
ओळखा पाहू मी कोण
उत्तर- नारळ
23. उंच वाढतो मी रंग आहे हिरवा
तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा
प्रदूषण करतो मी कमी
निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी
सांगा पाहू मी कोण
उत्तर- झाड
24. वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव
उत्तर- चश्मा
25. ऊनात चालताना मी येतो
सावलीत बसता मी जातो
वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो
सांगा पाहू मी कोण
उत्तर- घाम