Marathi Code | मराठी कोडी
मित्रांनो लहानपणीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे मराठी कोडी (Marathi Code). आणि मराठी कोडी सोडवायला सुद्धा खूप मज्जा येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कोडी (Riddles in marathi) पाहणार आहोत. ही कोडी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील.
1.अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे
नाव लपलेले आहे…
उत्तर : वांगी आणि शिमला
2. एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ? जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.
उत्तर : नवजीवन
3. रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
उत्तर : अँबुलन्स आग विझवित नाही
4. मी चालले राग राग,तु का ग माझ्या माग माग…
उत्तर : सावली
5. रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?
उत्तर : रामा
6. एवढं मोठं घर आणि त्याला एकच राखनदार…
उत्तर : कुलूप
7. तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण?
उत्तर : काका
8. ती धावत पळत समुद्रातून येते आणि किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते. ओळखा पाहू ती कोण ?
उत्तर : लाट
9. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही
उत्तर : नकाशा
10. अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?
उत्तर : पर्स
11. ऊन बघता मी येतो, सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण?
उत्तर : घाम
12. पाणी नाही, पाऊस नाही, रान हिरवेगार. कात नाही, चुना नाही, तोंड लाललाल.
उत्तर : पोपट
13. कोकणातून येतो, देश विदेशात जातो. मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा महान. पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण?
उत्तर : आंबा
14. आकाशातून पडली घार, तिला केलं ठार. रक्त प्यायलं घटाघटा, मांस खाल्लं पटापट.
उत्तर : नारळ
15. दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी…
उत्तर : डोळे
16. दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान
उत्तर : ट्रॅक्टर
17. इथेच आहे पण दिसत नाही
उत्तर : वारा
18. तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?
उत्तर : दहा रुपयाची अगरबत्ती घेईन आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल
19. लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट घालू शकत नाही?
उत्तर : मंगळसूत्र
20. असा कोण आहे जो तुमच्या नाखा वर बसून तुमचे कान पकडतो?
उत्तर : चष्मा
21. असा कोण आहे ज्याच्या जवळ पंख नसून सुद्धा तो उडतो?
उत्तर : पतंग
22. असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात?
उत्तर : वाढदिवसाचा केक
23. अशी कोणती खोली आहे ज्याला कोणताच दरवाजा आणि कोणतीच खिडकी नाही?
उत्तर : मशरूम
24. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देण्याअगोदर तुमच्याकडून घेतली जाते?
उत्तर : तुमचा फोटो
25. असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही ते वाचू शकत नाही?
उत्तर : भाग्य