Marathi Kodi With Answers | मराठी कोडी
नमस्कार, आज या लेखाद्वारे आपण मराठी भाषेतील एक मजेदार आणि कठीण Marathi kodi with answers सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मराठी कोडींच्या मदतीने तुमचे सामान्य ज्ञान नक्कीच वाढेल. उत्तर न पाहता कोडे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आम्ही प्रत्येक कोड्याखाली त्याचे उत्तर दिले आहे.
1. मी आहे तरी कोण
तिच्या डोळ्यात बोटे टाकली की
माझं तोंड उघडते
उत्तर- कात्री
2. कोणत्या महिन्यात
लोक सर्वात कमी झोपतात
उत्तर- फेब्रुवारी
3. प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती
जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही
उत्तर- वय
4. नाव एका माणसाचे चार अक्षरी
पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव
दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव
तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव
चारही अक्षर मिळून त्याचे नाव
ओळखा पाहू ते नाव काय
उत्तर- सिताराम
5. दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
सांगा पाहू मी कोण
उत्तर- मिशा
6. थंडीतही वितळणारी गोष्ट मी
सांगा तुम्ही माझे नाव काय
उत्तर- मेणबत्ती
7. पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते
हात नसूनही मी तुमच्याशी भांडते
सांगा पाहू मी कोण
उत्तर- पतंग
8. मी आहे वस्तू सोन्याची
तरीही मला किंमत नाही सोन्याची
सांगा पाहू मी कोण
उत्तर- BED
9. तीन अक्षरांचे माझे नाव
वाचा उलटे किंवा वाचा सरळ
मी आहे प्रवासाचे साधन
सांगा पाहू माझे नाव
उत्तर- जहाज
10. कोण आहे जो
आपली सर्व कामे
आपल्या नाकाने करतो
उत्तर- हत्ती
11. अशी कोणती गोष्ट आहे
जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही
उत्तर- दूध
12. एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
पहिल्या खोलीत भयानक आग असते
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे
उत्तर- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही
13. अशी कोणती गोष्ट आहे
जी सर्वात हलके असते
परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही
उत्तर- श्वास
14. एकदा एक माणूस रस्त्याने जात होता
अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली
व संपूर्ण भिजून गेला
तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही
असे कसे झाले
उत्तर- कारण तो माणूस टकला होता
15. एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले
तर ते कोणत्या बाजूला पडेल
उत्तर- कोंबडी कधी अंडी देत नसतो
16. अशी कोणती संपत्ती आहे
जी वाटल्याने वाढते
उत्तर- ज्ञान
17. हजार येतात हजार जातात
हजार बसतात पारावर
हाका मारून जोरात
हजार घेतात उरावर
उत्तर- बस किंवा रेल्वे
18. डोळा असून सुद्धा
मी पाहू शकत नाही
उत्तर- सुई
19. आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो
उत्तर- व्हेजिटेबल
20. तुम्ही जेवढे याच्याजवळ जाल तो मोठा होत राहील
उत्तर- डोंगर