Riddles in Marathi with Answer | मराठी कोडी
आपण बऱ्याच काळापासून वेगळी वेगळी कोडी सोडवत आलो आहोत. काही कोडी इतकी सोपी असतात की लहान मुलगा देखील त्याचे उत्तर पट दिशी देऊन टाकतो. परंतु अशी काही कोडी असतात की त्यांचे उत्तर शोधता शोधता चांगल्या बुद्धिवान लोकांचे मेंदूचा भुगा होतो.पण अती हुशार लोकही या दुनियेत कमी नाही. असे काही लोक हुशार असतात की त्यांच्यासमोर कोणतेही कोडे ठेवा त्याच अचूक उत्तर ते कोणताही वेळ वाया जाऊ न देता देतात. काही लोकांना मात्र सर्वसाधारण कोड्यांची उत्तर देण्यास बरेच दिवस निघून जातात. कोडीची उत्तरे शोधणे प्रत्येकाला आवडते. कोडीचे उत्तर देणेचे काही फायदे देखील आहेत. We have here some Riddles in Marathi with Answer which we are sure you would enjoy!
1. काही महिने 31 दिवसाचे असतात तर मग किती महिने 28 दिवसाचे असतात ?
उत्तरः प्रत्येक महिन्यात 28 दिवस असतात
2. समजा की तुम्ही एका बस मधून प्रवास करत आहात जीच्यातून अजून 10 प्रवासी प्रवास करत आहे. पहिल्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरून 4 प्रवासी बसमध्ये चढतात. दुसऱ्या स्टॉप वर 5 प्रवासी उतरतात व 2 प्रवासी बसमध्ये चढतात. तिसऱ्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरतात व 3 प्रवासी बसमध्ये चढतात. आता सांगा बसमधून एकूण किती प्रवासी प्रवास करत आहे ?
उत्तरः 11 (10 प्रवासी 1 आपण)
3. असे काय आहे की जे अग्नीत जळू शकत नाही, कोनत्याही शस्राने त्याला कापू शकत नाही, पाण्याने देखील ते ओले होत नाही आणि त्याचा मृत्यू देखील होत नाही ?
उत्तरः सावली
4. जर 8 चे अर्धे भाग केले तर 0 आणि 4 व्यतिरिक्त अन्य कोणते उत्तर बरोबर असू शकेल ?
उत्तरः 3
5. अशी कोणती बॅग आहेत जी भिजवल्यावर तीचे काम करते ?
उत्तरः टी बॅग
6. अशी कोणती भाजी आहे ज्यात कुलूप (लॉक) आणि चावी (की) दोन्ही येतात ?
उत्तरः लौकी (लॉक-की)
7. अशी कोणती वस्तू आहे ज्याला मुलगी परिधान पण करते आणि खाते पण ?
उत्तरः लवंग (लेंगा)
8. असं काय आहे ज्याच्याकडे रिंग आहे पण घालायला बोट नाही?
उत्तरः फोन
9. एक माणूस बाथरूममध्ये गेला आणि त्याने स्वत: ला त्याच्या डोळ्याच्या मध्यभागी गोळी मारली. तरीही तो माणूस वाचला. मला सांग कसं?
उत्तरः कारण त्याने आरशात गोळी झाडली
10. आपण एक बस ड्रायव्हर आहात. बस रिकामी सुरू होते. पहिल्या स्टॉपवर ४ लोक चढतात. दुसर्या स्टॉपवर ८ लोक चढतात आणि ३ उतरतात. तिसऱ्या स्टॉपवर २ लोक खाली उतरतात आणि ४ लोक चढतात. तर मला सांगा बस चालकाच्या डोळ्यांचा रंग काय आहे?
उत्तरः आपण बस ड्रायव्हर आहात (कोड्यातील पाहिलं वाक्य वाचा) . त्यामुळे बस चालकाचा डोळ्याचा रंग तुमच्यासारखाच असेल.
11. बहुतेक लोकांना मीच घाबरवतो, मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही.मी काय आहे?
उत्तरः मृत्यू
12. माझे तीन अक्षरांचे नाव,पहिला अक्षर काढला तर उरतो राम, २र काढला तर फळाचे नाव आणि ३र काढला तर करतो कापण्याचे काम
मला सांग माझं नाव काय आहे?
उत्तरः आराम
13. असं काय आहे जे पाणी देताच मरते?
उत्तरः आग
14. जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पिऊ शकता
जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता
आणि जर थंडी वाजेल तर तुम्ही ते जाळू शकता.
मला सांगा की ते काय आहे?
उत्तरः नारळ
15. असे काय आहे जेव्हा आपण जागे असता तेव्हा ते काय राहते?
झोप आल्यावर पडतो
उत्तरः पापण्या
16. दिसत नाही पण परिधान केले आहे
हे एका स्त्रीचे रत्न आहे
उत्तरः लाज
17. असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो? पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही.
उत्तरः आडनाव (लग्नानंतर स्त्रीचे आडनाव पतीच्या स्वत:च्या आडनावाशी जोडले जाते)
18. असं काय आहे जे आपण उचलता आणि ठेवता आणि त्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही.
उत्तरः पाऊल
19. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,कात नाही,चुना नाही, तरी तोंड कसं रंगल ?
उत्तरः पोपट
20. अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
उत्तरः स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात
21. एक माणूस ३० दिवस झोपला नाही, पण तरी त्याला काहीच problem नाही झाला? मला सांग कसं?
उत्तरः कारण तो रात्री झोपत होता
22. तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
उत्तरः घड्याळ
23. पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तरः कणीस
24. काळ्या रानात हत्ती मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
उत्तरः कापूस
25. अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?
उत्तरः वाहणारे नाक